ऍझटेक
Wikipedia कडून
अझ्टेक ही मध्य अमेरिकेतील प्री-कोलंबियन मेसोअमेरिकन संस्कृती १४ ते १५ व्या शतकात हल्लीच्या मेक्सिकोत होऊन गेली. त्या संस्कृतीने मध्य अमेरिकेत साम्राज्य स्थापले. संपूर्ण अमेरिकेतील जी दोन महान साम्राज्ये होती, त्यापैकी ती एक होती (दुसरे इंकांचे साम्राज्य). ते स्वताःस `मेक्सिका' (Mexicas)(नाहुआट्ल-Mexìcâ, IPA-[meˈʃiʔkaʔ]) म्हणवून घेत. त्यांची भाषा नाहुआट्ल होती. खगोलशास्त्र, वैद्यशास्त्र, गणित यांसारख्या क्षेत्रात त्यांनी गति गाठली होती.
अझ्टेकांचा केंद्रबिंदू मेक्सिकोच्या दरीत त्यांची राजधानी `टेनोच्टिटलान'मध्ये (Tenochtitlan) एकवटली होती. टेनोच्टिटलान टेक्सकोकोच्या तळ्यात उगवलेल्या छोट्या बेटावर बांधली गेली.