ग्रामोफोन
Wikipedia कडून
ग्रामोफोनचा शोध थॉमस अल्वा एडिसन याने लावला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे.
ग्रामोफोनच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोल (ड्रम - cylinder अथवा drum) वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडी (डिस्क - disc)चा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जाते.
ग्रामोफोनचा प्रथम प्रयोग एडिसनने 'मेरी हॅड ए लिट्ल लँब' ('Mary Had A Little Lamb') हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला.