आय. सी. सी. चँपियन्स करंडक २००६
Wikipedia कडून
आय. सी. सी. चँपियन्स करंडक २००६ ही क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा असून ती भारतामध्ये ७ ऑक्टोबरपासून नोव्हेंबर ५ २००६ पर्यंत खेळवली जाणार आहे. पूर्वी आय. सी. सी. नॉक आऊट ह्या नावाने ओळखली जाणारी ही आय. सी. सी. चँपियन्स करंडक नावाची स्पर्धा पाचव्यांदा खेळवली जात आहे. २००५ सालच्या मध्यापर्यंत ह्या स्पर्धेचे ठिकाण निश्चित नव्हते. शेवटी भारत सरकारने ह्या स्पर्धेपासून मिळणारे उत्पन्न करमुक्त केल्यावर ही स्पर्धा भारतात घेण्याचे ठरले (२००२ साली ही स्पर्धा भारतात घेण्याचे ठरले होते. पण भारताने ह्या स्पर्धेचे उत्पन्न करमुक्त करण्याची तयारी न दाखवल्याने ही स्पर्धा श्रीलंकेत घेतली गेली)