बरगंडी, प्रदेश
Wikipedia कडून
बरगंडी हा फ्रांसमधील एक प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रांसच्या स्वित्झर्लंडच्या सीमेस लागून आहे.
[संपादन] इतिहास
ई.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बर्गंडीयन्स नावाना ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. ई.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरगंडी, प्रोव्हेन्स जवळील लोअर बरगंडी व फ्रांसमधील डची ऑफ बरगंडी. अपर व लोअर बरगंडी ई.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रांसने डची ऑफ बरगंडी ई.स. १००४मध्ये बळकावले.
[संपादन] वाइन
या भागात तयार होणारी बरगंडी वाइन जगप्रसिद्ध आहे.