बुध ग्रह
Wikipedia कडून
बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा सर्वात लहान ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो.
बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून याला एकही उपग्रह नाही व त्यावर फ़ारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ९० ते ७०० केल्विन(-१८० ते ४३० सेल्सियस) इतके असते. सूर्यासमोरील भागाचे सर्वात जास्त तापमान तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वात कमी असे तापमान असते.
अनुक्रमणिका |
[संपादन] रचना
बुध हा पृष्ठभाग असणाऱ्या चार ग्रहांपैकी एक आहे व त्यामध्ये सर्वात लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि. मी. आहे. बुध हा ७०% धातुंपासून तर ३०% सिलिका यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची घनता हि ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.