शनि ग्रह
Wikipedia कडून
शनी सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून सूर्यमालेतील आकाराने दोन क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनिभोवती बर्फ व अंतरीक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] भौतिक गुणधर्म
शनी ग्रहाचा आकार हा त्याच्य़ा ध्रुवापाशी चपटा तर विषुववृत्ताजवळ जास्त फ़ुगिर आहे. त्याचा ध्रुवीय व्यास हा विषुववृत्तीय व्यासापेक्षा जवळपास १०% नी कमी आहे (१,२०,००० किमी व १,०८,७२८ किमी). हा आकार त्याला त्याच्य़ा जलद परिवलनामुळे व त्याच्या द्रव अवस्थेमुळे आला आहे. बाकिचे वायुने बनलेले ग्रह हि ध्रुवापाशी चपटे आहेत पण शनी इतके नाहीत. सूर्यमालेत फ़क्त शनीच पाण्यापेक्षा कमी घनता असणारा ग्रह आहे त्याची सरासरी विषिष्ठ घनता ०.६९ इतकी आहे. पण हि सरासरी घनता आहे. शनीचे बाह्यवातावरणाची घनता पाण्यापेक्षा कमी असून गाभ्याची घनता जास्त आहे.
[संपादन] शनीचे परिवलन
शनी त्याच्या अक्षाभोवती एकसमान गतीने फ़िरत नाही. गुरु ग्रहाप्रमाणे त्याला दोन कालावधी आहेत: प्रणली १ चा कालावधी १० तास १४ मिनिटे ०० सेकंद (८८४° दर पृथ्वी वरील दिवस) असून शनी ग्रहाचा पूर्ण विषुववृत्तीय प्रदेश यामध्ये येतो. विषुववृत्तीय प्रदेश हा दक्षिण विषुववृत्तीय पट्ट्याच्या उत्तर किनाऱ्यापासून उत्तर विषुववृत्तीय पट्ट्याच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पसरला आहे. प्रणाली २ मध्ये उर्वरित रेखांशाना १० तास ३९ मिनिटे २४ सेकंद (८१०° दर पृथ्वी वरील दिवस) लागतात.
[संपादन] शनीभोवतीची कडी
शनी त्याच्याभोवतीच्या कड्यांमुळे जास्त ओळखला जातॊ. हि कडी अधुनिक दूरदर्शी किंवा द्विनेत्रीच्या सहायाने पहाता येतात. हि कडि शनीच्या विषुववृत्तावर ६६३० कि.मी. ते १२०,७०० कि.मी. अंतरापर्यंत पसरलेली आहेत. कड्याची जाडी मात्र एक किलोमीटरच्या आसपास आसून ती सिलिका, आयर्न ऑक्साईड व बर्फ़ाचे कण ज्यांचा आकार धूळीकणांपासून ते एका दुचाकी पर्यंत असतो यांपासून बनलेली आहेत.
[संपादन] नैसर्गिक उपग्रह
शनीला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यांची निश्चित अशी संख्या सांगता येत नाही कारण त्याच्या सभोवतालच्या कड्यामधील सर्व तुकडे हे एका अर्थाने त्याचे उपग्रहच आहेत तसेच कड्यांमधील मोठा तुकडा व लहान चंद्र यामध्ये फ़रक करणेसुध्दा अवघड आहे. या सर्वांमध्ये फ़क्त सात उपग्रहांना त्यांच्या (त्यातल्या त्यात) जास्त वस्तुमानामुळे गोलाकार प्राप्त झाला आहे. शनीचा सर्वात लक्षणीय उपग्रह म्हणजे टायटन(Titan). संपुर्ण सूर्यमालेत फ़क्त याच उपग्रहाला दाट वातावरण आहे.