आत्माराम रावजी देशपांडे
Wikipedia कडून
|
||||
---|---|---|---|---|
उपाख्य | अनिल | |||
जीवनकाल | सप्टेंबर ११ १९०१ (मुर्तिजापूर) ते मे ८ १९८२ (नागपूर) |
|||
आई-वडिल | रावजी देशपांडे | |||
पती/पत्नी | कुसुमावती देशपांडे | |||
शिक्षण | बी. ए., एल. एल. बी. | |||
कार्यक्षेत्र | काव्य, साहित्य, समाजशिक्षण | |||
गौरव | साहित्य अकादमी |
अनुक्रमणिका |
[संपादन] ओळख
कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरु केला.
[संपादन] जीवन
जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९०१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर १९१९ साली पुणे शहरी आगमन. फर्गसन महाविद्यालाय येथे कला शाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रुपांतर आणि ६ ऑक्टोबर १९२९ ला विवाह संपन्न.
पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता ईथे प्रस्थान. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन. त्यानंतर १९३५ साली विधीशाखेची पदवी. सनद घेतल्यावर वकीलीचा व्यवसाय. १९४८ साली मध्यप्रदेश सरकार तर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली ईथे मुख्याधिकारी म्हणून आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणूका.
असा मार्गक्रम करत असताना मराठी वाङ्मयात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान. १९७९ साली साहित्य अकादमीची फेलोशिप.
मे ८, इ.स. १९८२ रोजी नागपूरला निर्वाण.
[संपादन] काव्यसंग्रह
- फुलवात १९३२
- प्रेम आणि जीवन
- भग्नमूर्ती (दिर्घकाव्य) १९३५
- निर्वासित चिनी मुलास (दिर्घकाव्य) १९४३
- पेर्ते व्हा १९४७
- सांगाती १९६१
- दशपदी १९७६