इडन गार्डन्स
Wikipedia कडून
[संपादन] इतिहास
१८६४ साली बांधण्यात आलेले इडन गार्डन्स मैदान भारतातील सर्वोत्तम क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. इ.स. १९३४ साली येथे पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला.
[संपादन] प्रेक्षक क्षमता आणि इतर
प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने इडन गार्डन्स हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठ्या मैदानांपैकी एक आहे. सुमारे ९०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानात एक लाखाहून अधिक क्रिकेट रसिकांनी सामना पाहिल्याच्या नोंदी आहेत. येथील खेळपट्टीच्या दोन टोकांना हाय कोर्ट एन्ड आणि पॅव्हिलियन एन्ड असे संबोधले जाते.