काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण
Wikipedia कडून
[संपादन] काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण
एकाद्या भूपृष्ठाला समांतर रीत्या ताणलेल्या लवचिक पडद्यावर एकादी जड वस्तू ठेवली असता त्या वस्तूभोवती पडद्यात जशी थोडी सुरकुत्यांची "विरूपता" निर्माण होते त्याच रीतीने वस्तुमान हा गुणधर्म असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीचा काळ-अवकाश अतिसूक्ष्मपणे वाकवते, आणि तो 'वाकवण्या'चा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे "गुरुत्वाकर्षण" असा एक उपसिद्धांत आइन्स्टाइननी आपल्या "सामान्य तौलनिक सिद्धांता"त ई.स. १९१५ मधे सादर केला होता. वर म्हटलेल्या पडद्यावर ठेवलेली वस्तू जर भोवर्यासारखी स्वतःभोवती फिरत असली तर ती आपल्याभोवती पडद्यात आणखी थोडी "विरूपता" निर्माण करते तीच गोष्ट पृथ्वीसारखी स्वतःभोवती फिरणारी वस्तू तिच्याभोवतीचा काळ-अवकाश वाकवताना करते असेही आइन्स्टाइननी म्हटले होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी हा अतिसूक्ष्म प्रक्रियेचा उपसिद्धांत अचूक असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सूक्ष्म उपकरणांच्या साह्याने अंतराळाची निरीक्षणे/मापने करून सिद्ध केले.