केंद्रशासित प्रदेश
Wikipedia कडून
जगातील अगदी लहान देश सोडले तर सगळे देश राज्यकारभार सोपा व्हावा यासाठी राज्य अथवा प्रांतात विभागीत केलेले आहेत. प्रत्येक राज्य वा प्रांत बहुधा स्वयंशासित असतात.
देशातील काही भाग कोणत्याही राज्य वा प्रांतांचा भाग नसतात परंतु त्यांचे शासन देशाच्या मध्यवर्ती सरकारकडून केले जाते. अश्या भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणतात.
अशा प्रदेशांच्या रचनेची कारणे अनेक असु शकतात - उदा. सीमावाद, विशिष्ट स्थिती, वगैरे.
केंद्रशासित प्रदेशाची उदाहरणे म्हणजे - अंदमान आणि निकोबार (भारत), मेक्सिको सिटी (मेक्सिको), इ.