के.बी. कुलकर्णी
Wikipedia कडून
के.बी. कुलकर्णी | |
पूर्ण नाव | कृष्णाजी भीमराव कुलकर्णी |
जन्म | ?? हिंडलगा, बेळगाव, भारत |
मृत्यू | मार्च ९, २००७ बेळगाव, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रकला, कलाअध्यापन |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
[संपादन] बाह्य दुवे
- ई-सकाळ, मार्च १०, २००७ मधील बातमीतील मजकूर (हा मजकूर संदर्भाकरिता उद्धृत करण्यात आला आहे. शब्दशः अनुवाद/उचलेगिरी करू नये. संदर्भाकरिता माहिती वापरून झाली की खालील मजकूर उडवावा.):
बेळगाव, ता. ९ - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार के. बी. कुलकर्णी (वय ८७) यांचे आज येथे सायंकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. गेले तीन महिने ते हिंडलगा (ता. बेळगाव) येथील त्यांच्या घरीच होते. आजारपणामुळे त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नव्हता. ....... त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगावातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. कुलकर्णी सर अविवाहित होते. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हिंडलगा या बेळगावनजीकच्या गावात जन्मलेले के. बी. कुलकर्णी यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९३७ मध्ये मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून चित्रकलेची पदवी संपादन केली. या काळात मुंबई येथील प्रख्यात चित्रकार जी. एस. हळदणकर यांच्या सहवासात ते आले. हळदणकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे बारकावे आत्मसात केले.
पदवीनंतर ते बेळगावला आले. येथील नामांकित सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. याच वेळी त्यांनी शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकात "चित्रमंदिर' ही प्रशिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेतूनच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील, विकास पाटणेकर, किरण हणमशेट उदयाला आले.
कुलकर्णी सरांचा शिष्यवृंद खूपच मोठा असून तो जगभरात पसरला आहे. त्यांनी बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्थेच्या शिनोळी येथील जे. एन. भंडारी आर्ट स्कूलमध्ये अनेक वर्षे मानद प्राचार्य म्हणून काम पाहिले.
कुलकर्णी सर चित्रकलेच्या सर्व प्रकारांमध्ये सिद्धहस्त होते. तैलचित्र, जलरंग, ऍक्रेलिक, कलर्स या सर्वांमध्ये त्यांचा हातखंडा होता. पेन्सिल ड्रॉईंग हा त्यांचा आवडता प्रकार त्यामध्ये त्यांची विशेष ख्याती होती. आपल्या विद्यार्थ्यांना पेन्सिल ड्रॉईंगमध्ये पारंगत करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. हा प्रकार चित्रकलेचे मूलतत्त्व असून यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने पारंगत व्हावे, असा त्यांचा आग्रह असे.
त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन अनेक ठिकाणी भरले. त्यांच्या शिष्यांनी ९ जानेवारीला मुंबईमध्ये वरळी येथील नेहरू कलादालनात कुलकर्णी सरांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन भरविले होते. हे त्यांचे शेवटचे प्रदर्शन ठरले. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील (कै.) चंद्रकांत मांडरे प्रतिष्ठानने अलीकडेच निवासस्थानी येऊन कुलकर्णी सरांचा सन्मान केला होता. कर्करोगाने त्रस्त असलेले कुलकर्णी सर गेल्या काही दिवसांपासून घरीच होते. त्यांच्या निधनानंतर कला क्षेत्रावर दुःखाचे सावट आले.