खिचडी
Wikipedia कडून
[संपादन] खाद्यपदार्थ
खिचडी , हा रुचकर आणि पौष्टिक खाद्यपदार्थ पच्शिम भारतातील महत्वपुर्ण खाद्यपदार्थ आहे. तांदुळ, मुगडाळ, हळद आणि मीठ हे याचे प्रमुख घटक आहेत. २:१ या प्रमाणात तांदुळ आणि मुगडाळ घेउन ती भाता प्रमाणे शिजवली जाते. लहान मुलांकरीता खिचडी आस्सट (जास्त पाणी घालून) शिजवली जाते. खिचडी पचनास सोपी व हलकी समजली जाते.
खिचडीचा रुचकरपणा वाढवण्या करिता आधी जीर्याची फोडणी करावी, आवडी प्रमाणे लसूण, अथवा मसाला विलायची (वेलदोडे) ,लवंग, जायपत्री, कलमी दालचिनी, टाकावे त्यात चिमुट भर हळद टाकावी. तांदुळ आणि मुगदाळ चे मिश्रण टाकावे. मीठ टाकुन भाता प्रमाणे शिजवावे. कालावधी १५ मिनीटे. गरम वाढावे.
सोबत विविध पदार्थ खाण्यास द्यावे जसे : पापड, लोणची, मोहरीची फोडणी, दुध, दही, ताक, लोणी, तूप,किंवा टोमॅटो/चिंच इत्यादीचे सार ,भजी.
[संपादन] संस्कृती व भाषा
सांस्कृतीक दृष्ट्या खिचडी हा साधारण पदार्थ आहे. सर्वसाधारणपणे न्याहरी(Breakfast)अथवा रात्रीच्या जेवणात वापरला जातो. तसेच मुले आणि आजारी व्यक्ति सुद्धा हा आहार घेतात. खिचडी हा शब्द मराठी भाषेत अनपेक्षित घटक अथवा व्यक्तींच्या एकत्र येण्यास उपहासाने वापरला जातो.