गिरीश कर्नाड
Wikipedia कडून
गिरीश कर्नाड | |
जन्म | मे १९, इ.स. १९३८ माथेरान, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | नाटककार, चित्रपटदिग्दर्शक, अभिनेता |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
साहित्यप्रकार | नाटक, कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | नाटके: तुघलक, हयवदन, नागमंडल |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार ([इ.स. १९९८ |
गिरीश कर्नाड (जन्म: मे १९, इ.स. १९३८), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] शिक्षण
कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्चशिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफोर्ड येथे झाले. कर्नाड शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशात बरेच नाव कमावले आणि त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले.
[संपादन] चित्रपट
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचे पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले जो एस्. एल्. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले.
नंतर त्यांनी बर्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट तब्बलियू नीनादे मगने ओंदनोंदू कालादल्ली तर हिंदीमध्ये उत्सव आणि गोधुली हे आहेत.
हल्लीच्या काळातील त्यांचा कानुरू हेग्गदिती हा कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारीत कन्नड चित्रपट नावजला गेला आहे.
त्यांना चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- संस्कार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
- वंशवृक्षसाठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
- भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे दिग्दर्शक म्हणुन काम केले (१९७४-७५).
कर्नाड यांचे गाजलेले चित्रपट:
- उंबरठा
- निशांत
[संपादन] नाटके
कर्नाड त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
- तुघलक
- ययाती
- अग्नी मत्तू मळे
- हयवदन
- तलेदंड
- नागमंडल
त्यांना साहित्य व नाटक यासाठी मिळालेले पुरस्कार
- होमी भाभा फेलोशीप (१९७०-७२)
- संगीत नाटक अकादमी नाट्यलेखनासाठी पुरस्कार (१९७२)
- नागमंडल साठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
- साहित्य अकादमी पुरस्कार(१९९४)
- ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)
ते १९७६-७८ मध्येकर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते.