गुरूनाथ आबाजी कुलकर्णी
Wikipedia कडून
गुरुनाथ आबाजी (अर्थात जी. ए.) कुलकर्णी हे मराठीमधील एक प्रसिद्ध कथाकार होते.
[संपादन] जीवन
जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म ई. स. १९२३ मध्ये झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. ते वैयक्तीक आयुष्यात अबोल व प्रसिद्धीविन्मुख मानले जातात. त्यांचा मृत्यु ई. स. १९८७ मध्ये झाला.
[संपादन] साहित्य
जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचे सर्व कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे:
- निळा सावळा
- हिरवे रावे
- पारवा
- रक्तचंदन
- काजळमाया
- सांजशकुन
- पिंगळावेळ
- रमलखुणा
- एक अरबी कहाणी
- अमृतफळे
- ओंजळधारा
- वैऱ्याची रात्र
- मुग्धाची रंगीत गोष्ट
- माणसे: आरभाट आणि चिल्लर
- बखर बिम्मची
[संपादन] इतर माहिती
- GAK इंग्रजी विकिपीडिया वरील पान
- काळ्या चष्म्याआडचा माणूस काळ्या चष्म्याआडचा माणूस