झी मराठी
Wikipedia कडून
झी मराठी ही झी नेटवर्क समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाहिनी आहे.
झी मराठी वाहिनीची सुरुवात १९९९ मध्ये झाली. २००४ पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, मराठी चित्रपट असे विविध कार्यक्रम दाखवतात.
नक्षत्रांचे देणे, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे, वादळवाट अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे.
२००३ मध्ये या वाहिनीने "झी मराठी ऍवार्डस" या नावाने मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्यांना प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार निवडून पुरस्कार देण्याचे चालू केले.मराठी नाटके,चित्रपट पारितोषिके वितरण कार्यक्रम झी गौरव पुरस्कार हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय आहे. नुकतीच झी २४ तास नावाची वृत्तवाहिनी सुरु करण्यात आली आहे.
प्रत्येक महिन्यातील एका रविवारी "महासिनेमा" अंतर्गत एका लोकप्रिय नवीन मराठी सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येते. आतापर्यंत महासिनेमा मध्ये श्वास, अगंबाई अरेच्च्या, आई, सातच्या आत घरात या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.