तेल्हारा
Wikipedia कडून
तेल्हारा
हे गाव अकोला ह्या जिल्हा ठिकाणाहून उत्तर पश्चिमेला तालुका म्हणून आहे. गाव तसं छोटंसंच पण खूप छान. तापी पुर्णा खोऱ्यातील काळी कसदार जमीन. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू.
गावात श्री शिवाजी महाविद्यालय व शेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी द्वारे प्राथमिक ,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवल्या जातात. तसेच विज्ञान शाखेचा कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय स्तरावरचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कला व वाणिज्य शाखेच्या पदवी पर्यंतचा अभ्यासक्रमासाठी श्री गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. आताशा शिक्षण पदविका व शिक्षण पदवी हे अभ्यासक्रम सुद्धा सुरू झाले आहेत.
गावच्या बाहेर दत्तवाडी म्हणुन दत्ताचे सुदंर देऊळ आहे. येथे दर दत्त जयंतीला यात्रा भरते.
गावातुन एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पुर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मधात आणि गावाच्या दक्षिणेकडे श्री गौतमेश्वराचे सुंदर देऊळ आहे. फार पुरातन शिवलिंग येथे स्थापित आहे. गावात लटीयाल भवानी मंदिर(भवानी पेठ) विठ्ठल मंदिर(मुख्य पेठ), दुर्गादेवी (प्रताप चौक) , मारोती मंदिर (कसबा) गजानन महाराज मंदिर ( वान प्रकल्प) महानुभाव पंथी कृष्ण मंदिर ( गाडेगाव रस्ता) प्रसिध्द आहेत.