नामदार गोपाळ कृष्ण गोखले
Wikipedia कडून
नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
|
||||
---|---|---|---|---|
Gokhale stamp.png | ||||
उपाख्य | ?? | |||
जीवनकाल | ९ मे १८६६ ते १९१५ (पुणे) |
|||
आई-वडिल | कृष्ण गोखले | |||
पती/पत्नी | ?? | |||
शिक्षण | ?? | |||
कार्यक्षेत्र | सामाजिक आणि आर्थिक सुधारणा, अस्पृश्यता/जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार |
|||
गौरव | ?? |
[संपादन] राजकीय प्रवास
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना इ.स. १९१९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.
[संपादन] सामाजिक सुधारणा
इ.स. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.