पद्मविभूषण पुरस्कार
Wikipedia कडून
पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.
जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्नपेक्षा कमी आणि पद्मभूषणपेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगीत करण्यात आला होता.