पावलो कोएलो
Wikipedia कडून
पावलो कोएलो हे एक प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आहेत. 'द अलकेमिस्ट' हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक असून सन २००५ पर्यंत त्याच्या ४.३ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक जगातील ५६ भाषांत प्रकाशित झाले आहे. याखेरीज 'व्हेरोनिका डिसाइड्स टू डाय', 'इलेवन मिनिट्स', ' द फ़िफ़्थ माउन्टेन' आणि 'द डेव्हिल ऍण्ड मिस प्रॅम' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांना फ़्रांसचा लेजिअन द ऑनर, वर्ल्ड एकोनोमीक फ़ोरमचा क्रिस्टल अवार्ड ही पारितोषिके मिळाली आहेत. कोएलो हे जगाला प्रेरणा देणारे एक लेखक आहेत. [1][[2]]