बटाटेवडा
Wikipedia कडून
बटाटेवडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.
बटाटेवडा हा तेलात तळलेला खाद्यपदर्थ आहे. असतो. तो दिसायला गोलाकार असतो. त्याचे वरचे आवरण हे द्रवरुप डाळीच्या पिठाचे असते (जे तळल्यावर जास्त घट्ट होते), व आतमध्ये उकडलेल्या व फोडणी दिलेल्या बटाट्यांचे मसालायुक्त मिश्रण असते.
[संपादन] पाककृती
प्रथम उकडलेल्या बटाट्यांचा लगदा केला जातो. लगद्यामध्ये मसाले मिसळून (व लागल्यास फोडणी देऊन) त्याचे मुठीएवढे गोळे केले जातात. त्याचबरोबर डाळीच्या पिठाला पाण्यात मिसळून त्याच्यात तिखट-मीठ घातले जाते. याने त्याचे एक किंचित घट्ट द्रावण तयार होते.
यानंतर या बटाट्याच्या वाटोळ्यांना डाळीच्या पिठाच्या द्रावणात बुचकळले जाते व द्रावणाचा लेप लागल्यावर त्यांना गरम तेलात सोडले जाते. तेलामध्ये पडल्यावर पिठाचे आवरण तेल शोषून घेते. आवरणाचा रंग साधारणतः सोनेरी ते भुरका रंग होईपर्यंत बटाटेवड्याला तळले जाते, व तशाच गरम स्थितीत तेलातून काढल्यावर बटाटेवडा खावयास तयार होतो.
वडा-पाव या खाद्यपदार्थातील वडा हा प्रमुख घटक म्हणजे बटाटेवडाच होय.