भारतीय प्रमाण वेळ
Wikipedia कडून
भारतीय प्रमाण वेळ ही भारतात वापरली जाणारी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेच्या ५.३० तास पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता. भारतीय प्रमाण वेळ ८२.५° रेखांशावरील स्थानीक वेळ आहे. साधारपणे अलाहाबाद जवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि यु.के. तील रॉयल ऑब्जरवेटरी (ग्रीनवीच) यांच्यात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानीक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण ऑफिशियली राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा, दिल्ली येथे आधुनीक उपकरणांचा वापर करून वेळ मोजली जाते. [en:Indian Standard Time (IST)]