मंगल पांडे
Wikipedia कडून
मंगल पांडे हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानला जातो. ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपाई असल्याने मंगल पांडेने बराकपूर छावणीत मार्च २९, १८५७ रोजी पलटणीच्या ब्रिटिश अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.