मुळशी
Wikipedia कडून
मुळशी हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] भौगोलिक माहिती
[संपादन] भौगोलिक स्थान
मुळशी तालुक्याचे भौगोलिक स्थान १८ अंश २५’ उत्तर ते १८ अंश ४१’ उत्तर रेखांश आणि ७३ अंश २०' पुर्व ते ७३ अंश ३५' पुर्व अक्षांश असे आहे. हा तालुका पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला वसलेला आहे. मुळशी तालुक्याची हद्द पुर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिड्लेली आहे.
[संपादन] भौगोलिक वैशिष्ट्ये
ह्या तालुक्याचे ठ्ळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्रि पर्वताचा डोंगराळ भाग. सह्याद्रि पर्वताचे पश्चिमेकडिल कोंकणात कोसळणारे कडे अतिशय़ लक्षणीय आहेत. त्यामानाने पुर्वेकडे मात्र इतक्या तीव्र चढणीचे कडे आढ्ळत नाहित. मुळशी तालुक्यातील सह्याद्रिच्या मुख्य रांगेपासून दोन उपरांगा पुर्वेकडे पसरल्या आहेत. ह्या उपरांगांमुळे मुळा आणि निळा ह्या दोन नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत. कोरीगड (समुद्र सपाटीपासूनची उंची ३२५० फ़ूट) हे तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.
[संपादन] पर्ज्यन्यमान
मुळशी तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्ज्यन्यमान ४५०० मि.मी आहे.