राजगड
Wikipedia कडून
किल्ला | |
---|---|
नाव | राजगड |
उंची | १३९४मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत, पाली |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था |
किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड श्री. शिवछत्रपतींच्या कार्याचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ की.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खो-याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठीकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकील्ला आकाराने लहान असल्याने राजकिय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असुन त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजुने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षितता होती म्हणुन राजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असुन समुद्रसपाटीपासुन त्याची उंची १३९४ मीटर आहे.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
कर्जत, पाली बसस्थानकावरुन जाणा-या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन.