विमान
Wikipedia कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] विषय प्रवेश
विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युध्दसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो.
[संपादन] ओळख
विमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धड, पंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युध्दसाहित्य, तसेच चालककक्ष, इंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.
द्रवातील वेगबदलामुळे दाबफरक निर्माण होण्याच्या द्रवभौतिकीच्या नियमाचा वापर करून विमान आकाशात उडते.
[संपादन] इतिहास
पौराणिक काळापासून विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिध्द 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.
आधुनिक इतिहासात ऑरविल आणि विलबर राईट बंधूंनी यशस्वी रीत्या विमान आकाशात उडवले. त्यांच्या आधी व नंतरही विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग झाले. त्यातूनच आजच्या रूपातील विमानाची निर्मिती झाली.
[संपादन] विमानांचे वर्गीकरण
विमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.
उपयोगानुसार:
- प्रवासी विमान
- मालवाहू विमान
- लढाऊ विमान
संरचनेनुसार:
- पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
- शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)
- (गायरो?)
वेगानुसार:
- स्वनातीत (सुपर सॉनिक)
शक्तीस्त्रोतानुसार:
- दट्टायंत्र (प्रॉपेलर)
- उष्णवायुझोतयंत्र (जेट)
उड्डाणतत्त्वानुसार:
- हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
- हवेपेक्षा हलके (वायुफुगा)