सोमनाथ चटर्जी
Wikipedia कडून
सोमनाथ चॅटर्जी (जुलै २५, इ.स. १९२९-) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि १४व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्वप्रथम १९७१ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणुक जिंकली. त्यानंतर १९८४ चा अपवाद वगळता ते ८ वेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. १४व्या लोकसभेत ते पश्चिम बंगाल मधील बोलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
मागील: मनोहर जोशी |
लोकसभेचे अध्यक्ष जून ४, २००४ ते विद्यमान |
पुढील: विद्यमान |