आल्फोन्सो दुसरा
Wikipedia कडून
आल्फोन्सो दुसरा तथा आल्फोन्सो द'अरागोन (नोव्हेंबर ४, ई.स. १४४८ - डिसेंबर १८, ई.स. १४९५) हा जानेवारी २५, ई.स. १४९४ ते मृत्युपर्यंत नेपल्सचा राजा होता.
हा फर्डिनांड पहिला व त्याची प्रथम पत्नी, क्लेरमोंटची इसाबेल यांचा मुलगा होता.
आल्फोन्सो राजा झालेला कळल्यावर फ्रांसचा राजा चार्ल्स आठवा याला इटली काबीज करायची संधी दिसली व त्याने सप्टेंबर ई.स. १४९४मध्ये चढाई केली आणी नेपल्सच्या जवळ येउन ठेपला. हे पाहुन घाबरलेल्या आल्फोन्सोने पदत्याग केला व आपला मुलगा, फर्डिनांड याला राजा केले व स्वतः संन्यास घेतला.
यानंतर वर्षभरात तो मृत्यु पावला.