कोथरुड
Wikipedia कडून
कोथरुड हे पुणे शहराचे एक महत्वाचे उपनगर आहे. १९९० नंतर ह्या उपनगराचा विस्तार झाला. ’आशिया खण्डातील सर्वात वेगाने वाढ झालेले उपनगर’ असा बहुमान कोथरुडकडे जातो. ’कर्वे रस्ता’ आणि ’पौड रस्ता’ हे कोथरुडमधील दोन महत्वाचे रस्ते आहेत. एम. आय. टी. आणि कमिन्स कॉलेज ही दोन प्रतिथयश महाविद्यालये येथे आहेत. कोथरुडमधील काही महत्वाची ठिकाणे: दशभुजा गणेश मंदिर, मॄत्युंजयेश्वर मंदिर, जयभवानी मंदिर, पौड उड्डाण पुल, यशवंतराव चव्हाण नाट्यगॄह, सिटी प्राईड चित्रगॄह, वेदभवन