डब्ल्यू ए सी ए मैदान
Wikipedia कडून
पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या मोठ्या शहरातील W.A.C.A. अर्थात (West Australian Cricket Ground) हे एक आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटचे प्रसिध्द मैदान आहे. येथे १९७०-७१ च्या मोसमात पहिला कसोटी सामना खेळला गेला. उसळत्या खेळपट्ट्या आणि पर्थचे उष्ण हवामान यामुळे या मैदानावरचा कसोटी सामना खेळाडूंची शारीरीक आणि मानसिक कसोटी पाहतो. २४,००० प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानावर क्रिकेटखेरीज रग्बी आणि फुटबॉलचेही सामने आयोजित केले जातात. एकदिवसिय सामन्यांसाठी येथे प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात आलेली आहे.