डॉ. लक्ष्मण देशपांडे
Wikipedia कडून
डॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार आहेत. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी ई.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून आतापर्यंत याच नाटकाचे १९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रुपे सादर करतात.