पंढरपूर
Wikipedia कडून
पंढरपूर सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.
पंढरपूरमध्ये नदीच्या काठाववर प्रसिद्ध विठोबा मंदिर आहे. विठोबा हा कृष्णाचा अवतार समजला जातो. विठ्ठल हे नाव कानडीतील विष्णूच्या नावावरून आले आहे. विठोबाची पत्नी रखुमाई होय.
पुराणांपासुन विठोबाची भक्ती केली जाते. संत नामदेव,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. मोठ्या क्षेत्रावर बांधलेल्या या मंदिराला सहा प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.
पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत ४ लाख भाविक सहभागी होतात. भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात.
पंढरपूर प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे जन्मस्थळ आहे.