प्लांकचा स्थिरांक
Wikipedia कडून
प्लांकचा स्थिरांक हा पुंजाच्या शक्तीचे (quantum energy चे) कंप्रतेशी गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. पुंज यामिकाच्या सिद्धांतात या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, पुंजवादाच्या जनकांपैकी एक असलेल्या माक्स प्लांक यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे:
E ही प्रारणातील फोटॉनची पुंजशक्ती (quantized energy) असून, \nu ही फोटॉनची हर्त्झमधील कंप्रता आहे, तर \omega ही फोटॉनची प्रतिसेकंद रेडियन एककातील कोनीय कंप्रता (angular frequency) आहे.