फलटण
Wikipedia कडून
फलटण | |
जिल्हा | सातारा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ८२,००० २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६६ |
टपाल संकेतांक | ४१५ ५२३ |
वाहन संकेतांक | MH-११ |
फलटण सातारा जिल्ह्यातील एक तालुका व महत्त्वाचे शहर आहे.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. येथे एक प्रसिध्द श्रीराम मंदीर आहे जे फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदीरही प्रसिद्ध आहे.
[संपादन] शैक्षणिक संस्था
- कमला निंबकर बालभवन
- फलटण हायस्कूल
- मालोजीराजे शेती विद्यालय
- मुधोजी महाविद्यालय
- मुधोजी हायस्कूल
- यशवंतराव चव्हाण हायस्कूल
- शासकीय तंत्रनिकेतन (आय. टी. आय)
- श्रीमंत मालोजीराजे इंग्रजी माध्यमिक शाळा
[संपादन] मनोरंजन
- इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन
- नामवैभव चित्रपटगृह
- राजवैभव चित्रपटगृह
[संपादन] फलटण येथे कसे पोहोचावे
फलटण हे सातारा पासून सुमारे ६७ कि.मी. तर पुण्यापासून सुमारे ११० कि.मी लांब आहे. पुण्याहून सासवड - जेजुरी - निरा - लोणंद या मार्गे तसेच सातारा हुन वडुथ - वाठार(स्टेशन)- आदर्की या मार्गे फलटणला जाता येते. फलटणला जाण्यासाठी वरील दोन्ही ठिकाणांवरुन राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची चांगली सोय आहे.
हा लेख सध्या अपूर्ण आहे.
विशेष माहितीसाठी येथे संपर्क साधा. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=5844759