बाजरी
Wikipedia कडून
बाजरी (इंग्रजी: Pearl Millet) हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिका देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुन पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.