बुरूज
Wikipedia कडून
पूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारी बाजूंच्या भिंती जोडणार्या ज्या बहुधा गोलाकार भिंती असत त्यांना बुरूज ही संज्ञा आहे. बुरुजांवर तोफांची स्थापना करण्यात येऊन आणि दारुगोळा ठेवण्यात येऊन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी नेमण्यात येत असत.
बुरूज हे किल्ल्यांचे एक फार महत्वाचे आणि कणखर अंग असे कारण शत्रूच्या माऱ्यात बुरूज ढासळला म्हणजे किल्यात शत्रूचा शिरकाव सोपा होत असे.