भारतीय रिझर्व बँक
Wikipedia कडून
भारतीय रिझर्व बॅंक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.
[संपादन] प्रमुख उद्देश
भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालिलप्रमाणे आहेत:
- भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
- भारताची गंगाजळी राखणे.
- भारताची आर्थिक स्थिती राखणे.
- भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
[संपादन] इतिहास
भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना भारतीय रिझर्व बॅंक कायदा १९३४ अन्वये एप्रिल १, १९३५ रोजी करण्यात आली. बॅंकेचे प्रमुख कार्यालय प्रथमपासुनच मुंबई येथे असुन येथुनच बॅंकेचे प्रमुख कार्य चालते. सुरुवातीस बॅंकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु ई.स. १९४९ पासुन बॅंक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे.