भारतीय लोकशाही
Wikipedia कडून
भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बर्याच काळापासून अस्तित्त्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करुन लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. या करता उमेदवाराच्या पात्रतेपासून शासन चालवण्यापर्यंत सध्याचे अड्थळे जाणून घेऊन नियम बनवले पाहिजेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] सध्याचे अडथळे
- अपात्र उमेदवार
- दलबदल
- निवडणूक खर्च
- शासन स्थापना
- अविश्वास ठराव
[संपादन] उमेदवाराची पात्रता
सर्व राजकीय पक्ष उमेदवार निवडी करता एकच निकष वापरतात, तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. मतदारही मत देण्याकरता धर्म, जात, वैयक्तिक ओळख, नातेसंबंध अशा प्रकारचे निकष मत देण्याकरता वापरतात. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधून ते राबवण्याची क्षमता ना पक्ष विचारात घेतात ना मतदार. या करता पात्रतेबाबत अस्तित्त्वात असलेल्या नियमामध्ये आणखी काही निकष जोडले पाहिजेत.