मार्च १२
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७० वा किंवा लीप वर्षात ७१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] विसावे शतक
- १९१८ - रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.
- १९२८ - कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
- १९३० - ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
- १९३८ - जर्मनीचे सैन्य ऑस्ट्रियात घुसले.
- १९४० - फिनलंडने सोवियेत संघाशी तह करुन फिनिश कारेलिया देउन टाकले व आपले सैन्य व जनता तेथून हलवली.
- १९६० - दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
- १९६७ - सुहार्तो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६८ - मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९२ - मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
- १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
- १९९९ - चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.
[संपादन] एकविसावे शतक
- २००३ - सर्बियाच्या पंतप्रधान झोरान डिंडिकची हत्या.
- २००४ - दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युनवर तेथील संसदेने महाभियोग सुरू केला.
- २००६ - क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचा ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.
[संपादन] जन्म
- १८२१ - सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.
- १८८१ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- ६०४ - पोप ग्रेगोरी पहिला.
- १३७४ - गो-कोगोन, जपानी सम्राट.
- १४४७ - शाह रुख, पर्शियाचा राजा.
- १८८९ - योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट.
- १९९९ - यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार.
- २००१ - रॉबर्ट लुडलुम, अमेरिकन लेखक.
- २००३ - झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- राष्ट्र दिन - मॉरिशियस.
मार्च १० - मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - मार्च १४ - (मार्च महिना)