शिर्डी
Wikipedia कडून
शिर्डी | |
जिल्हा | अहमदनगर |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२३ |
वाहन संकेतांक | MH-१६ |
शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. शिर्डी हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. शिर्डी हे साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे.
[संपादन] साईबाबा
साईबाबा शिर्डी येथे राहिले आणि येथेच त्यांनी महासमाधी घेतली. सर्व धर्माचे लोक साईबाबांच्या दर्शनाला येतात.
[संपादन] वाहतूक
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे सध्या रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी कोपरगाव (१५ कि.मी.) येथे उतरावे. मनमाड (८३ कि.मी.) हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.