श्रीनिवास वरधन
Wikipedia कडून
श्रीनिवास वरधन (जानेवारी २, १९४०:मद्रास-) हे एक गणितज्ञ आहेत. ते सध्या कुरंट गणितीय विज्ञान संस्था, न्यूयॉर्क विद्यापीठ येथे गणिताचे प्राध्यापक आहेत. त्यांना मार्च २२, इ.स. २००७ या दिवशी गणितातील नोबेल पारितोषिक समजले जाणारे अबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
वरधन यानी बी.एस्.सी. आणि एम्.ए. मद्रास विद्यापीठातून केले. इ.स. १९६३ मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथून पी.एच्.डी. पदवी मिळवली. त्यानंतर पुढील संशोधनासाठी ते कुरंट गणितीय विज्ञान संस्था, न्यूयॉर्क विद्यापीठ येथे गेले.