स्टेफी ग्राफ
Wikipedia कडून
स्टेफी(स्टेफानि) मरिआ ग्राफ (जन्म: १४ जून १९६९, मानहाइम) ही जर्मनीतील आत्तापर्यंतची सर्वात जास्त यश-किर्ती मिळविलेली टेनिसपटू आहे.
[संपादन] स्पर्धात्मक यश
स्टेफी ग्राफने जगातील महत्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये २२ वेळा विजेतेपद पटकविले : सात वेळा विंबल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलिअन ओपन, पाच वेळा अमेरिकन ओपन. अशाप्रकारचे यश मिळवणा-यांत औस्ट्रेलिअन मार्गारेट स्मिथ कौर्ट (२४ वेळ विजेती) पाठोपाठ स्टेफी ग्राफचा जगात दुसरा क्रमांक लागतो. १०७ जागतिक स्पर्धाविजेतेपदांसह (एकेरी विजेतेपद) ती मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट पाठोपाठ तिस-या स्थानावर आहे. स्टेफीने ऑलिंपिक स्पर्धा तसेच फेडेरेशन कप (१९८७ आणि १९९२) स्पर्धांमधेही चांगली कामगिरी बजावली.
१९८८ साली स्टेफीने सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्या वर्षीच्या सेऊल ऑलिंपिकमधील टेनिसमधील महिला एकेरीचे विजेचेपद जिंकून 'गोल्डन ग्रँड स्लॅम' पूर्ण केले.
[संपादन] व्यक्तिगत
स्टेफी ही प्रसिद्ध टेनिसपटू आंद्रे अगासीशी विवाहीत आहे.
हे देखील पाहा. भारतीय टेनिसपटू