स्वामी विवेकानंद
Wikipedia कडून
स्वामी विवेकानंद (जानेवारी १२ १८६३ - जुलै ४ १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते.
विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ असे होते. ते मुळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य व वारसदार होते. श्री रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी, त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आजही कार्यरत आहेत.
१८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. त्यांनी फारच सुंदर वकृत्त्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.
जुलै ४ १९०२ ह्या दिवशी त्यांनी भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी येथे समाधी घेतली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर विवेकानंद स्मारक उभे आहे.