सदस्य चर्चा:Sankalpdravid
Wikipedia कडून
Archives जुन्या चर्चा येथे आहेत |
पासून | पर्यंत |
---|---|---|
चर्चा १ (Archive 1) | जून ८, २००५ | मार्च २९, २००७ |
अनुक्रमणिका |
[संपादन] चित्रपटअभिनेते
संकल्प,
जरी चित्रपटअभिनेतेचे चित्रपटाभिनेते असे संधीकरण व्याकरणनियमांनुसार होत असले तरी मला वाटते की असे करण्याने हे येथील भाषा अधिकाधिक क्लिष्ट होत जाईल. मराठी विकिपीडियावरील भाषा ही व्याकरणदृष्ट्या अचूक पण त्याचबरोबर शक्य तितकी सोपी असावी असे माझे मत आहे. असे केल्याने कमीतकमी मराठी शिकलेल्या व्यक्तीलाही याचा अर्थबोध लवकर होईल व उपयुक्तता वाढेल. मला तर वाटते की चित्रपटअभिनेतेचे परत चित्रपट अभिनेते करावे.
असो. इतर विद्वान मंडळींचे मत काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
अभय नातू १४:२९, २९ मार्च २००७ (UTC)
- साध्या किंवा साधारण वापरात असलेल्या शब्दांबद्दल प्रश्नच नाही राष्ट्र पतीचा अर्थ राष्ट्रपती पेक्षा वेगळा होऊ शकतो! त्यामुळे असे शब्द सामासिकच वापरले पाहिजेत.
- अभय नातू १४:५४, २९ मार्च २००७ (UTC)
'राष्ट्र पती'चा वेगळा काय अर्थ होऊ शकतो ते मला समजू शकत नाही, तरीसुद्धा राष्ट्रपती असे जोडूनच लिहायला पाहिजे. ते व्याकरणदृष्ट्यापण योग्य आहे. चित्रपटाभिनेते संपूर्णतः बरोबर असले तरी, आणि संकल्पद्रविडांचा सामासिक शब्दांचा कितीही रास्त आग्रह असला तरी असे जोडशब्द मराठीच्या अर्वाचीन प्रकृती आणि संकेतांना धरून नाहीत असे माझे चुकीचे का होईना पण प्रांजळ मत आहे. मी विद्वान नाही, तरीसुद्धा नातूंच्या 'अर्थबोध आणि उपयुक्तता यांचा बळी देऊन क्लिष्ट सामासिक शब्द बनवू नये' या विचारांशी मी सहमत आहे. --J--J १७:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
- राष्ट्र पती हे माझ्याकडून आलेले चुकीचे उदाहरण होते. माझा म्हणण्याचा उद्देश होता की काही शब्दांचा अर्थ सामासिक व असामासिक रुपांत वेगळा होउ शकतो (वर्तमानपत्र - न्यूझपेपर, वर्तमान पत्र - आत्ताचे पत्र). अशावेळी जेथे जे पाहिजे तेच वापरले पाहिजे.
- अभय नातू १७:०८, १० एप्रिल २००७ (UTC)
-- वर्तमान पत्र/वर्तमानपत्र---अगदी योग्य उदाहरण!.--J--J १८:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
[संपादन] लेख वाचन
नमस्कार संकल्प,
काहि ठिकाणि लेख न दिसता फ़क्त कुठल्यातरी कोडचावापर करा अस येतय, त्यासाठी काय करावे? उदा: gnu.org.com असे. मी नविन असल्याने ल़क्षात येत नाहिये. कृ पया सांगता का?
[संपादन] Re : संपादनपद्धतीविषयी
I will try to take care of this particular problem in the future.
Maihudon ११:५२, ९ एप्रिल २००७ (UTC)
[संपादन] क्वांटम
संकल्प,
मला क्वांटम या शब्दासाठी पुंजभौतिकी असे वाचल्याचे आठवते आहे. तसेच जर्मन नावांजवळ (उदा. माक्स प्लांक लेखातील विद्यापीठांची नावे) त्यांची मराठी किंवा इंग्लिश उच्चारही दिले तर त्यांना ओळखणे सोपे होईल.
अभय नातू ०४:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
महाराष्ट्र सरकारच्या भाषासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या भौतिकशास्त्र परिभाषा कोशात(१९८१) 'क्वांटम'साठी 'क्वांटम' हाच शब्द दिला आहे. फिजिक्स ला भौतिकशास्त्र आणि फिजिक्सच्या एखाद्या शाखेसाठी भौतिकी. उदाहरणार्थ क्लासिकल फिजिक्ससाठी अनाधुनिक भौतिकी, न्यूक्लीयर फिजिक्ससाठी न्यूक्लीयी भौतिकी आदी. क्वांटम फिजिक्स(?) असा काही विषय असेल तर त्याला हिंदी प्रतिशब्द पुंजभौतिकी असू शकेल. हिंदी शब्दांपेक्षा मराठी शब्द वेगळा असावा. क्वांटम मेकॅनिक्सला क्वांटम स्थितिगतिशास्त्र असा प्रतिशब्द कोशात आहे.--J--J १७:३३, १० एप्रिल २००७ (UTC)
[संपादन] वेस्ट ईंडीझ
संकल्प,
वेस्ट ईंडीझ हा स्थानिक उच्चार आहे. इंडीज हा हिंदी उच्चार वाटतो.
अभय नातू १५:३८, १० एप्रिल २००७ (UTC)
ईंडीझ मधील ई बद्दल मी स्थानिक व्यक्तीकडून पुनः खात्री करून घेईन. सध्या वेस्ट इंडीझ असे मुख्य पान ठेवले आहे.
अभय नातू १६:३२, १० एप्रिल २००७ (UTC)
डॅनिएल जोन्जने त्याच्या उच्चारकोशात इंडिज़(ज़- दंततालव्य-उर्दूतला) हा उच्चार दिला आहे. मराठीतल्या 'झापड'(डोळ्यावर येते ती) किंवा झग्यातला झ हिंदीत नाही. त्यामुळे z चा उच्चार त्यांना ज़ेड(ज ला नुक्ता) असा लिहावा लागतो. मराठीत दोन झ आहेत, त्यामुळे आपल्या इंग्रजी- मराठी कोशात ज़ की ज्य असा गैरसमज होऊ नये म्हणून ज़ च्या ऐवजी झ असे छापले असते. अमेरिकन हेरिटेज डिक्शनरीत इंडीज़ हा उच्चार आहे. मराठीच्या उपान्त्य स्वर दीर्घ लिहिण्या-उच्चारण्याच्या प्रकृतीशी हा दीर्घ डी जुळतो. 'इ' मात्र कुठेही दीर्घ नाही.--J--J १७:५५, १० एप्रिल २००७ (UTC)
[संपादन] लेख लिहिणे
संकल्प मी गोवा हा लेख संपादित करायला घेतो आहे. तर जे इंग्लिशमध्ये दिले आहे त्याचं भाषांतर करायचं का?
-समीर