एन्.टी. रामाराव
Wikipedia कडून
नंदमुरी तारक रामाराव (मे २३,इ.स. १९२३:निम्माकुरू, कृष्णा जिल्हा, आंध्र प्रदेश-जानेवारी २३, इ.स. १९९६:हैदराबाद, आंध्र प्रदेश) हे तेलुगु चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांची गणना तेलुगु चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते.त्यांनी २०० पेक्षाही अधिक तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले.
इ.स. १९८२ मध्ये त्यांनी तेलुगु देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका पक्षाने जिंकून रामारावांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. १९८४ मधील एका महिन्याचा अपवाद वगळता ते १९८९ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगु देसम पक्षाचा पराभव झाला. पण १९९४ साली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि रामाराव दुसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वतीला पक्षात मिळत असलेल्या वाढत्या महत्त्वामुळे त्यांचे जावई एन्.चंद्रबाबू नायडू यांनी रामारावांविरूध्द ऑगस्ट १९९५ मध्ये बंड केले. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचे समर्थन नायडूंनाच मिळाले आणि रामारावांना मानहानीकारक परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावे लागले.
जानेवारी २३, इ.स. १९९६ रोजी त्यांचे निधन झाले.
मागील के.विजयभास्कर रेड्डी |
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जानेवारी ९, १९८३–ऑगस्ट १६, १९८४ |
पुढील एन्.भास्कर राव |
मागील एन्.भास्कर राव |
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सप्टेंबर १६, १९८४–डिसेंबर ३, १९८९ |
पुढील एम्.चन्ना रेड्डी |
मागील के.विजयभास्कर रेड्डी |
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री डिसेंबर १२, १९९४–सप्टेंबर १, १९९५ |
पुढील एन्. चंद्रबाबू नायडू |