कोल्हापूर
Wikipedia कडून
कोल्हापूर | |
जिल्हा | कोल्हापूर |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२३१ |
टपाल संकेतांक | ४१६ ००१ |
वाहन संकेतांक | MH-09 |
कोल्हापूर हे सुंदर शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेले आहे. कोल्हापूरची लोकसंख्या ४,१९,००० च्या आसपास आहे. मुख्य भाषा मराठी असुन हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे. हे पंचगंगा नदीच्या काठावर आहे. शहराच्या आसपास बरेच डोंगर आणि किल्ले आहेत. छत्रपती शाहूमहाराजांमुळे शहराचा विकास शक्य झाला. कोल्हापूर पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय ख्यातीचे खासबाग कुस्ती मैदान ही येथे आहे. तसेच येथील चप्पल जगतविख्यात आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] संस्कृती
[संपादन] प्रेक्षणीय स्थळे
- रंकाळा तलाव
- पन्हाळा गड
- महालक्ष्मी मंदीर
- भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
- ज्योतिबा मंदीर
- न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
- टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
- दाजीपुर : अभयारण्य
- गगनबावडा : हिरवीगार झाडी आणि धबधब्यासाठी उत्कृष्ट जागा
[संपादन] मनोरंजन
[संपादन] खरेदी
- कोल्हापुरी चपला
[संपादन] परिवहन
ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस
लोहमार्गाने मुंबई, नागपूर आणि बंगळूर दररोज गाड्या आहेत.
[संपादन] हवामान
कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.
कोल्हापूरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असुनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते.
पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबर च्या दरम्यान भरपुर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से. च्या दरम्यान असते.
कोल्हापूरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.
[संपादन] स्वाद
- कोल्हापूरी तांबडा पांढरा रस्सा आणि मांसाहारी जेवण
- कोल्हापूरी मिसळ - फडतरे, बावडा, खासबाग, चोरगे
- राजाभाऊ भेळ
- पाणीपुरी
- राजस्थानी पापड
- पेरिना, सोळंकी आईसक्रिम - कॉकटेल, मसाला पाचक सोडा (डायजेस्टीव्ह)
- पावभाजी
- बटाटे वडा आणि कांदा भजी
- ईतर दुग्धजन्य पदार्थ
[संपादन] शिक्षण संस्था
- शिवाजी विद्यापीठ
- कोल्हापुर प्राद्योगिकी संस्थान (KIT)
- डि.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीयरींग अन्ड टेक्नोलोजी
- तात्यासाहेब कोरे इंस्टिट्युट ऑफ इंजिनीयरींग अन्ड टेक्नोलोजी, वारना नगर
- डि.के.टी.ई. सोसाईटी चे टेक्सटाईल ऍन्ड इंजिनीयरींग इंस्टिट्युट, इचलकरंजी
- भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापुर
- सी.पी.आर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय
- भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेन्ट, कोल्हापुर
- राजाराम महविद्यालय
[संपादन] उद्योग
[संपादन] प्रसिद्ध व्यक्ती
- शाहू महाराज
- रणजीत देसाई
- सुर्यकांत मांडरे
- चंद्रकांत मांडरे
- भालजी पेंढारकर
- वी. शांताराम
- शिरीष बांदारकर
- आशुतोष गोवारीकर
- जयंत नारळीकर