चिपळूण
Wikipedia कडून
चिपळूण | |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | N/A २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२३५५ |
टपाल संकेतांक | ४१५६०५ |
वाहन संकेतांक | MH-०८ |
निर्वाचित प्रमुख | N/A (N/A) |
चिपळूण हे महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
चिपळूण ह्याचा अर्थ परशुरामाचे निवासस्थान असा आहे.येथून जवळच लोटे परशुराम येथे विष्णुचा अवतार परशुराम ह्यांनी समुद्रात बाण मारुन कोकणभूमी तयार केली अशी अख्यायिका आहे. लोटे परशुराम येथे परशुरामाचे प्राचीन मंदिर आढळते.
[संपादन] वहातूकीची साधने
चिपळूण हे मुंबई-गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग १७) वसलेले आहे. चिपळूण हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बसेसनी जोडलेले आहे. कोकण रेल्वेवरील ते एक महत्वाचे स्थानक आहे.
[संपादन] प्रमुख व्यवसाय
नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख पारंपारिक व्यवसाय आहेत. आता चिपळूण निव्वळ ऐतिहासिक शहर नसून ते एक औद्योगिक शहर बनले आहे. चिपळूण परिसरात अनेक केमिकल्स आणि औषधांचे कारखाने आहेत. वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प येथून जवळच आहे.
[संपादन] पर्यटनस्थळे
- परशुराम मंदिर, लोटे परशुराम
- वाशिष्ठी पॉईंट
- गुहागर (व्याडेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा)
- डेरवण ( शिवाजी महाराज स्मारक)