Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Web Analytics
Cookie Policy Terms and Conditions मनोगत - विकिपीडिया

मनोगत

Wikipedia कडून

मनोगत हे युनिकोड वापरून तयार केलेले मराठी भाषेतले एक संकेतस्थळ आहे. मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा असलेल्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आणि आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देणे हा मनोगतकारांचा हेतू आहे. मनोगतचे सदस्य सामान्यतः "मनोगती" या नावाने ओळखले जातात. मनोगतची सध्याची नोंदणीकृत सदस्यसंख्या ३५००हून अधिक आहे. मात्र त्यातले सगळे सदस्य कार्यरत नाहीत. एकाच मनोगतीचे एकाहून अधिक नावांनी सदस्यत्व असल्याचे मनोगतला पुष्कळदा आढळते.

मनोगतींनी आजपर्यंत यशस्वीपणे पार पाडलेले मेळावे असे:

मुंबई - दिनांक : १९ जून २००५ व १३ नोव्हेंबर २००५

पुणे - दिनांक : ???

ठाणे - दिनांक : १३ फेब्रुवारी २००६

अनुक्रमणिका

[संपादन] मनोगत साहाय्य

[संपादन] मूलभूत

[संपादन] नाव नोंदणी

[संपादन] व्यक्तिरेखा

  1. व्यक्तिरेखेसाठीच्या पानावर वर डाव्या कोपऱ्यात "माझे सदस्यत्व' असे दिसेल त्यावर "शिफ्ट" दाबून टिचकी मारा, म्हणजे ते नवीन खिडकीत उघडेल आणि इथल्या सूचना वाचत वाचत बदल करता येतील.
  2. त्या वेगळ्या खिडकीत उघडलेल्या पानाच्या वरच्या बाजूला "संपादन" नावाचा टॅब दिसेल. त्यावर टिचकी मारा.
  3. त्यात टॅब च्या खाली "खात्याची मांडणी" आणि "वैयक्तिक माहिती" असे दोन 'दुवे' दिसतील.
  4. "वैयक्तिक माहिती" वर टिचकी मारा.
  5. तिथे तुम्हाला हवी ती माहिती भरा.
  6. माहिती भरताना शुद्धलेखन तपासायला विसरू नका!

[संपादन] नवे/पूर्वीचे लेख

[संपादन] प्रतिसाद

[संपादन] उपप्रतिसाद

[संपादन] नवा लेख/चर्चा

  1. उजवी कडे तुमच्या नावावर टिचकी दिल्यास जे पर्याय दिसतात त्यातील 'लेखन करावे' हा पर्याय निवडा
  2. योग्य तो लेखन प्रकार निवडा
  3. लेखन शुद्धलेखन चिकित्सका कडून तपासून प्रकाशित करा.

[संपादन] व्यक्तिगत निरोप

[संपादन] शुद्धलेखन

  1. प्रतिसाद/निरोप
    1. प्रतिसाद/निरोप टंकित करा.
    2. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकित करा.
    3. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत न्या.
    4. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर ती काढा.
    5. मनोगतवर सगळीकडे टंकित करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर 'बरोबर खूण' आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
    6. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचना देईल. ज्या पटतील तेवढ्या घ्या.
    7. 'झाले'वर टिचकी मारायला विसरू नका.
    8. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
    9. जोवर तुमच्या प्रतिसादाला कोणी प्रतिसाद देत नाही तोवर तुम्ही हे कितीही वेळा करू शकता. त्यासाठी 'बरोबर खुणेवर' टिचकी मारा. लेखनात हवे ते बदल करा आणि मुद्दा क्र.२ पासून पुढे जा.
  2. नवीन लेख लिहिताना-
    1. लेख लिहा
    2. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकित करा.
    3. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत नेऊन ठेवा.
    4. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
    5. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
    6. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
    7. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
    8. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
    9. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.
  3. आधी लिहून ठेवलेला किंवा प्रकाशित केलेला लेख-
    1. त्या लेखाच्या पानावर जा.
      1. जर प्रकाशित केलेला नसेल तर
      2. जर कोणी प्रतिसाद दिला नसेल तर वर 'संपादन' अशी पाटी(टॅब) दिसेल, त्यावर टिचकी मारा.
    2. लेख प्रकाशित करायच्या आधी ज्या पानावर होतात त्याच पानावर जाल.
    3. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत घेऊन जा.
    4. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
    5. मनोगत वर सगळीकडे टंकित करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर 'बरोबर खूण' आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
    6. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
    7. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
    8. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.
    9. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून शीर्षक लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकित करा आणि तपासून झाल्यावर तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
    10. जोवर तुमच्या लेखनाला कोणी प्रतिसाद देत नाही तोवर तुम्ही हे कितीही वेळा करू शकता.

[संपादन] तांत्रिक

[संपादन] दुवा देणे

दुवा म्हणजे एखाद्या पानाची सेवादात्यावरील जागा (पाथ किंवा लोकेशन). जेंव्हा आपण दुव्यावर टिचकी मारतो तेंव्हा आपला ब्राऊजर त्या दुव्याशी संलग्न पानाची मागणी सेवादात्याकडे करतो आणि सेवादात्याकडून आलेले पान आपल्याला दाखवतो.

  1. तुमच्या लिखाणात त्या दुव्याची प्रत चिकटवा. (http://mr.wikipedia.org असा)
  2. लिखाणाच्या खिडकीवर असलेल्या खुणांच्या ठिकाणी एचटीएमएल फेरफार अशा खुणेवर निवडीची खूण करा.(तिथे <A href="http://mr.wikipedia.org/">http://mr.wikipedia.org</A> असे दिसेल)
  3. आता दुसर्‍यांदा दाखवल्या जाणार्‍या दुव्या ऐवजी तुम्हाला अपेक्षित नाव लिहा. (उदा. <A href="http://mr.wikipedia.org/">मराठी विकिपीडिया</A> असे दिसेल)
  4. परत वरच्या खुणांतल्या "एचटीएमएल फेरफार" अशा खुणेवरील निवडीची खूण रद्द करा. आता तुमच्या दुव्याऐवजी तुम्ही सुचवलेला शब्द राहून त्याला दुव्याचे स्वरूप येईल. (उदा. मराठी विकिपीडिया)
  5. लिखाण पुरे करून नेहमीप्रमाणे सुपूर्त करा.

[संपादन] दुवा टूल टिप

  1. दुव्यावर दर्शक नेल्यास जी माहिती दिसते तिला 'टूल टिप' असे म्हणतात. मनोगतमधे दिलेल्या दुव्यावर हवी ती माहिती आणण्यासाठी पुढील बदल करावे लागतात.
  2. लिखाणाच्या खिडकीवर असलेल्या खुणांच्या ठिकाणी एचटीएमएल फेरफार अशा खुणेवर निवडीची खूण करा.तिथे (तिथे <A href="http://mr.wikipedia.org/">http://mr.wikipedia.org</A> असे दिसेल)
  3. आता <a व href= च्या मध्ये जी सूचना दिसणे अपेक्षित आहे ही title="विकिपीडिया मराठीतून!" अशी लिहा. (उदा <a title="विकिपीडिया मराठीतून इथे पाहा" href="http://mr.wikipedia.org"> मराठी विकिपीडिया </a>)इथे "विकिपीडिया मराठीतून इथे पाहा" अशी टूल टिप दिसेल व दुव्याला "मराठी विकिपीडिया" हे नाव असेल.

[संपादन] दुवा नवीन खिडकीत उघडणे

  1. दुव्याशी संलग्न पान नवीन खिडकीत उघडावे अशी इच्छा असेल तर दुवा देण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. (उदा.<a href="http://mr.wikipedia.org/" target="_blank">मराठी विकिपीडिया</a>)
  2. इथे एका विशिष्ट जागी target="_blank" अशी भर घातली आहे. अशा दुव्यावर टिचकी मारली असता पान नवीन खिडकीत उघडेल.

[संपादन] दुवा लहान करणे

  1. tinyurl.com

[संपादन] चित्रांचा वापर

  1. आपल्याला हवी असलेली छायाचित्रे जीओसिटीज/फ्लिकर सारख्या मुक्त संकेतस्थळांवर अपलोड करा. जीओसिटीज/फ्लिकरवर याहूची नोंदणी व परवलीचा शब्द वापरता येईल.
  2. त्याचा दुवा लेखात/प्रतिसादात चिकटवा.
  3. मग, इथे HTML फेरफार वर टिचकी मारा. आपल्याला मजकुराचा कोड दिसेल.
  4. त्या ठिकाणी, <img src=" आपला दुवा इथे चिटकवा "> मध्ये ती चिटकवा.
  5. दोन चित्रांमध्ये जागा सोडायची असल्यास <> मध्ये br व ओळ हवी असल्यास <> मध्ये hr असे लिहावे.
  6. यानंतर पुन्हा HTML फेरफार वर टिचकी मारा व लेखात/प्रतिसादात परत या.

[संपादन] युनिकोड लिखाण

मनोगतवर मराठीतून लिहिण्यासाठी टंकलेखनाची सोय आहे, परंतु त्यासाठी संपर्क ("कनेक्षन") असावे लागते. 'ऑफलाईन कंपोजिंग' म्हणजे नेटवर न जाता मराठीतून लिहिणे.

[संपादन] अक्षरमाला

  1. या संकेतस्थळावरून अक्षरमाला हे सॉफ्ट्वेअर उतरवून घ्या.
  2. आपल्या संगणकावर ते कार्यान्वित करा.
  3. Ctrl+Shift+t या कळ समूहाच्या वापराने अक्षरमाला मध्ये रोमन ऐवजी देवनागरीतून लिखाण करता येईल.

[संपादन] इंडिक

[संपादन] बरहा

ह्यासाठी 'बरहा' चा उपयोग करावा लागेल.हे सॉफ्टवेअर या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे.

  1. तेथे जाऊन baraha6.0 ही फाईल आधी डाऊनलोड करुन घेणे.
  2. ही फाईल रन करावी, म्हणजे हे सॉफ्टवेअर आपल्या पीसी वर इंस्टॉल होईल.
  3. हे सॉफ्टवेअर 'रन' करावे. जो स्क्रीन ओपन होईल त्यावर तुम्हाला दोन भाग दिसतील, खालचा आणि वरचा. त्यातील खालील भागात मराठी वाक्ये इंग्रजी कीज वापरुन (म्हणजे की बोर्डवरच्या)फोनेटीकली टाईप करता येतात. तशी करावी.
  4. 'एडीट' ह्या 'मेन्यू'त जाऊन 'कन्व्हर्ट' ह्या सबमेन्यूवर क्लिक केल्यास इंग्रजीत टाईप केलेल्या वाक्यांचे मराठीत रुपांतर होईल.ते स्क्रीनच्या वरच्या भागात दिसेल.
  5. स्क्रीनच्या वरच्या भागात माऊसचा कर्सर नेऊन 'राईट क्लिक करावे. एक मेन्यू ओपन होईल. त्यात 'कॉपी स्पेशल' ह्या सबमेनुवर क्लिक करावे.तेव्हा एक चॉइस मागणारी खिडकी उघडेल. त्यातला 'टेक्स्ट युनिकोड' हा पर्याय निवडावा.
  6. मनोगतवर जाऊन जेथे लिखाण करायचे असेल तेथे माऊसचा कर्सर न्यावा. मग 'एडीट' ह्या (मनोगतवरच्या) मेन्यूत जाऊन 'पेस्ट' करावे. आपण आधी टाईप केलेला सर्व मजकूर तेथे अगदी थोड्या सेकंदात मराठीत उमटेल; . मग तो नीट तपासून 'प्रकाशित' करण्यासाठी सुपूर्त करावा.

ह्यातील 'बराहा डायरेक्ट' ही युटीलिटी वापरुन थेट मराठीतसुद्धा टाईप करता येते.

  1. बराहा डायरेक्टच्या आयकॉनवर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
  2. संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
  3. F12 कळ दाबली असता वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
  4. त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
  5. मनोगतवर जसे ctrl+t ने आपण इंग्लिश-मराठी उडी मारतो तसे इथे F11 कळ दाबल्याने होईल.
  6. आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!

[संपादन] मनोगतावरील इतर तांत्रिक माहिती

[संपादन] आस्कि

यामध्ये शिवाजी १,२ आणि ५, किरण, श्री लिपी, C-DAC चे i-leap टंक.. असे प्रकार मोडतात. हे टंक विंडोज ९८, XP, २००० अशा कुठल्याही कार्यप्रणालीवर चालतात. कारण ते त्या त्या विशिष्ट कंपनीच्या मालकीचे असतात.

[संपादन] युनिकोड

मनोगत हे युनिकोड वापरून तयार केलेले संकेतस्थळ आहे. फक्त विंडोज २००० व त्याहून प्रगत कार्यप्रणाली युनिकोड जाणू शकतात. विंडोज ९८ मध्ये युनिकोड वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 'Hook API' ही संकल्पना विकसित केली आहे. भारतामध्ये भारतीय भाषांवर काम सी-डॅक व मॉड्युलर या प्रमुख संस्था आहेत. युनिकोड मानके (स्टँडर्डस्) ठरवण्याचे काम ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर चालणारी युनिकोड कन्सॉर्शियम ही संस्था करते.


[संपादन] मनोगत - टॉप टेन - भाग १

सर्वात जास्त लेख लिहिणाऱ्यांची दहा नावे आणि लेखांची संख्या[1]

वेदश्री - १८० नीलहंस - १२५ तुषारजोशी - ११९ प्रसाद - ११५ माधव कुलकर्णी - १०६ नरेंद्र गोळे - १०४ अनु - १०३ जयन्ता५२ - ९४ सर्वसाक्षी - ९३ चित्त - ८८

ज्यांच्या लेखांना सर्वात जास्त एकूण प्रतिसाद आले त्यांची नावे, आणि प्रतिसादांची संख्या

वेदश्री - २३९३ विसोबा खेचर - १९६६ अनु - १४४१ प्रवासी - १३३४ सर्वसाक्षी - १३२७ माधव कुलकर्णी - १३२६ चित्त - १३१९ प्रसाद - १२६४ नीलहंस - १२३२ विनायक - १०८९

ज्यांच्या लेखनाला प्रति-लेख सरासरी जास्तीत जास्त प्रतिसाद आलेत त्यांची नावे आणि प्रति-लेख सरासरी प्रतिसाद

आशिष पाटील - ८६ प्रिती सुर्वे - ५८ नितीन - ५५.५ मीमराठी - ५३ योगी - ५२ देसी - ५१ अजित साठे - ५१ गिरीश - ४७.५ आशा कऱ्हाडे - ४७ लेखकु - ४३.५

वरीलप्रमाणेच, परंतु ज्यांनी १० किंवा जास्त लेख लिहिले आहेत त्यांनाच अंतर्भूत केले आहे

मृदुला - ३५.६२५ भोमेकाका - २९.३०७ प्रियाली - २७ विनायक - २४.७५ प्रवासी - २४.७० आशुतोश - २४.६९ मी आशुतोष - २४.०७ वृकोदर - २३.६७५ विसोबा खेचर - २३.१२९ उद्धट - २२.७६


वेगेवेगळ्या लेखनप्रकारांनुसार केलेले टॉप टेन (म्हणजे टॉप टेन कवी वगैरे पुढच्या लेखात.)


[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्यदुवे

मनोगत

युनिकोड

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] विकी वरील संबंधित इंग्रजी दुवे

युनिकोड

ट्रान्स्लिटरेशन

एच.टी.एम.एल.

मुलभूत एच. टी. एम. एल. मार्गदर्शन

आपल्या संगणकावर इतरत्र देवनागरी कसे पाहाल?

गमभन - टंकलेखन सुविधा

Static Wikipedia 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu