शिव्या
Wikipedia कडून
शिवी म्हणजे दुसर्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठीत देखिल अनेक प्रकारच्या शिव्या रुढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा[संदर्भ द्या] प्रभाव दिसून येतो.
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारिरीक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुन देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वात जास्त अपमानकारक समजल्या जातात.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रकार
[संपादन] धर्म व जातीवाचक शिव्या
भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाती-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.[ संदर्भ हवा ]
कृपा करुन अशा शिव्या (विशेषतः जातीवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपिडीयावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातीवाचक शिव्या हा विभाग पहा.'
[संपादन] त्यातल्या त्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे
गाढव , नालायक, बेशरम,हरामखोर,हलकट,चोंबडा,चावट,कृतघ्न,'गाढवाला गुळाची चव काय?' बावळट ,
[संपादन] लैंगिकता
[संपादन] नातेसंबंध
[संपादन] नातेसंबंध आणि लैंगिक संबंध
- आईला/ आईचा/ मायला /मायचा
"आईला" किंवा "आईचा" या शिव्या अलीकडील काळात सर्रास व्यवहारात वापरल्या जातात. फक्त "आईला" किंवा "आईचा" या शब्दांना गलिच्छ अर्थ नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या आईचा अपमान करण्यासाठी वापरल्या जाणऱ्या "तुझ्या आईचा xxxx" किंवा "तुझ्या आईला xxx" या शिव्यांचे ते छोटे स्वरूप आहे.
[संपादन] अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म
- शिंच्या, रांच्या
हे दोन्ही शब्द शिंदळीच्या आणी रांडेच्याची लघुरुपे आहेत. शिंदळीचा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर रांडचा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडीलांचा उल्लेख नसतो.)
[संपादन] बोंब
कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सूर लावून,स्वतःच्याच हाताच्या विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सूर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून ऊघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निशेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचीत निशेध मोर्चांमध्ये सुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदा पेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).बोंब मारणे[1] आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या "शिमगा"च्या[2] सणाच्या निमीत्ताने होते. पेटलेल्या होळी भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते.महाराष्ट्रातील काही भागात संपूर्ण रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळे पणाने कोणत्याही बंधना शिवाय सर्व शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे.अशा शिव्या देण्यात अर्थ न सामजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे. समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तिला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत "*** करतय कोण ,त्याच्या ***त *** दोन " अशा किंबहुना अधिक अश्लिल शिव्यांचा समावेश असे.
[संपादन] अध्याहृत अर्थावर आधारित शिव्या
- साला
'साला' हा वस्तुत: 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ'; बहिणीचा नवरा' नव्हे.) या अर्थीचा हिंदी भाषेतील शब्द आहे. 'बायकोचा भाऊ' अशाच अर्थाने याचेच 'साळा' हे रूप मराठी भाषेतही काही भागांत/काही समाजांत प्रचलित आहे.
हा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून का गणला जातो याचे एक सुंदर स्पष्टीकरण श्री. खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या पुस्तकात आढळते.
थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणार्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो.
महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो.
[संपादन] मराठी साहित्यात शिव्यांचा वापर
[संपादन] संत साहित्यातील शिव्यांचा वापर
मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.
उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।।
अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।।
लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।।
काय केले रांडलेका। तुला राजी नाही तुका।। २४७८
- रांडलेका हा शब्द अनौरस (विधवेची [वैधव्यानंतर जन्मलेली]) संतती या अर्थी वापरला आहे.
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥
तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥1॥
जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥
थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७