सिमोन बॉलिव्हार
Wikipedia कडून
सिमोन होजे अंतोनियो दि ला सान्तिसिमा त्रिनिदाद बॉलिव्हार इ पॅलासियोस (जुलै २४, ई.स. १७८३-डिसेंबर १७, ई.स. १८३०) हा दक्षिण अमेरिकेतील एक क्रांतिकारी नेता होता.
त्याने व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, पनामा, आणी बॉलिव्हिया या देशांना स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी कामगिरी निभावली. या सगळ्या देशांमध्ये तो एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्याला तेथे एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) म्हणून संबोधण्यात येते.
सिमोन बॉलिव्हार चा जन्म वेनेझुएलातील काराकास या शहरात झाला. ई.स. १८०२ मध्ये त्याने मारिया तेरेसा रोद्रिगेझ देल तोरो इ अलाय्साशी लग्न केले. दुर्दैवाने त्यानंतर एकाच वर्षात तिचा मृत्यू झाला. सिमोन बॉलिव्हारने परत लग्न केले नाही.
दहा वर्षे ग्रान कोलंबिया (बृहत् कोलंबिया)च्या अध्यक्षपदाचा भार वाहिल्यावर डिसेंबर १७, १८३० रोजी त्याने क्षयरोगाशी झगडताना देह ठेवला.