इंदूर
Wikipedia कडून
इंदूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पूर्वेला आहे.
शहर फार पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा 'मालवा' या प्रांतातील इंदूर या शहराची जहागीरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या पुत्रवधु अहिल्याबाई होळकरने राज्य कारभार सांभाळला आणि त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते. इंदूरच्या मध्यात उभा असलेला राजवाडा आजही मराठी साम्राज्याचा इतिहास सांगतो.
शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे आणि तापमान कक्षा जास्त आहे. हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप तापतो.
शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुनं आणि नवं असं दोन भागात आहे. जुनं गाव म्हणजे राजवाड्याच्या मागचं ! येथील कापड बाजार फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार. येथे संध्याकाळी सराफा बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात.